Friday, December 26, 2014

new word added for new generation in dictionary


नव्या पिढीचे नवे शब्द

गेल्या वर्षभरात डिक्शनरीत समाविष्ट झालेले नव्या पिढीचे काही 'गिकी' शब्द आणि नव्या संकल्पना. या शब्दांबद्दल आणि या नव्या पिढीच्या या बदलत्या भाषेबद्दल..
WDYT
आजची इ-जनरेशन इतकी फास्टफॉरवर्ड आणि टेक्नोसॅव्ही आहे की, त्यांच्या राहणीमानात, वागण्यातच नाही तर भाषेतसुद्धा बदल होताना दिसतात. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्स आणि सोशल नेटवर्किंगच्या या युगात इंग्रजी ही सर्वमान्य संवादाची भाषा बनली असली तरीही ऑनलाइन चॅटिंग आणि मेसेजिंगकरिता जगभरातली युवा पिढी वापरते ती इंग्रजी वेगळीच आहे. या इन्स्टंट मेसेजिंगची आपली अशी एक भाषा आहे. त्यात अनेक नवी संक्षिप्त रूपं, वाक्प्रचार, संकल्पना आहेत. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनं याची दखल घेतली. गेल्या वर्षभरात डिक्शनरीत भर पडलेले असेच काही नवे शब्द आणि त्यांचे अर्थ.. माहिती करून घ्यायलाच हवेत WDYT?
Ur fone's oor. Me coming tomoz. Kept message with dad... ICYMI.
नुकत्याच व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅक्टिव्ह झालेल्या नेहाच्या आईला नेहाने पाठवलेला हा मेसेज. त्यांना पोरीनं काय लिहिलंय, नेमकं कुठल्या भाषेत लिहिलंय याचा थांगपत्ताच लागत नव्हता. कारण अध्र्याहून अधिक शब्द हे तिने शॉर्ट कटमध्ये लिहिले होते. यालाच आजची जनरेशन मोबाइल लिंगो म्हणते. म्हणजे मोबाइलवर मेसेज करताना, ट्विटरवर अपडेट करताना वापरली जाणारी शॉर्टकटची भाषा. भराभर टाइप करताना हल्ली अनेक शब्द संक्षिप्त स्वरूपात लिहिले जातात. Your  चं Ur होतं, तेव्हा आजकालच्या मुलांची काय ही भाषा आणि काय ते अशुद्ध लिहिता असाच सूर मोठय़ांकडून ऐकायला मिळतो खरा, पण आता यातले काही शब्द चक्क ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये समाविष्ट झालेत. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी वर्षांतून तीन वेळा अपडेट करण्याची पद्धत आहे. प्रत्येक तिमाहीत काही नवे शब्द डिक्शनरीमध्ये समाविष्ट केले जातात. २०१४ मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीत नव्याने समाविष्ट झालेल्या शब्दांमध्ये मोठय़ा प्रमाणावर या नव्या युगाच्या इंटरनेट सॅव्ही पिढीच्या वापरातले शब्द अ‍ॅड झाले आहेत. वरच्या वाक्यातले fone, tomoz, ICYMI हे नेहाचे शब्द आता डिक्शनरीत दिसतील.
आजची वायर्ड जनरेशन इतकी फास्टफॉरवर्ड आणि टेक्नोसॅव्ही आहे की बदल हे त्यांच्या राहणीमानात, वागण्यातच नाहीत तर बोलण्यात आणि भाषेतसुद्धा होताना दिसतात आणि याची दखल आता ऑक्सफर्ड डिक्शनरीनेसुद्धा घेतली आहे. एसएमएसच्या भाषेमध्ये लोकप्रिय असलेले काही शॉर्ट फॉर्म्स यात आहेतच. शिवाय काही नव्या जमान्याच्या वेगळ्या संकल्पनाही आहेत. काही वाक्प्रचारही आहेत. आजच्या डिजिटल जमान्यात सर्वमान्य भाषा इंग्रजी असली तरी व्यक्त होण्याची भाषा गिकी आहे. मोडतोड केलेलं इंग्रजी असं याकडे न बघता शब्दांचा वेगळा वापर असं बघायला मदत व्हावी आणि नव्या जमान्याशी नाळ तुटू नये, म्हणून हे प्रयत्न केले जात असावेत. म्हणूनच तरुणांच्या बोलीभाषेतील डकफेस, महुसीव, अल डेस्को अशा शब्दांना आता ऑक्सफर्ड डिक्शनरी स्थान मिळाले आहे.
इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅपवरून चॅटिंग करताना कमी वेळात आणि पटापट टाइप करताना शब्दाच्या संक्षिप्त रूपाची गरज भासते आणि ट्विटरसारखी शब्दमर्यादा असलेली सोशल नेटवर्किंग साइट वापरत असाल तर शब्द काटेकोरपणेच वापरावे लागतात. यामध्ये शब्दांची नाही तर कॅरॅक्टर्सची मर्यादा असते. त्यामुळे शब्दांचे शॉर्टकटच वापरले जातात. xlnt, fone, tomoz  हे शब्दसुद्धा आता ऑक्सफर्ड डिक्शनरीचा भाग आहेत. यात मूळ शब्दाची इंग्रजीतील स्पेिलग बदलून लहान करण्यात आली आहे. बोली भाषेतली नेहमीची वाक्य संक्षिप्तरूपात लिहिली जाऊ लागली आहेत. मत्रिणीने किंवा मित्राने WDYT  असं टेक्स्ट केलं तर त्याला त्यानं स्पेिलगमध्ये गल्लत केलीये अशा भ्रमात राहू नका. तुम्हाला 'व्हॉट डू थिंक' असं विचारण्याचा तो शॉर्टकट आहे. काही नवीन संकल्पनाही रुजू होत आहेत. सेल्फी म्हणजे काय, हे आता कुणाला सांगायला नको. स्वत:चा फोटो काढताना बऱ्याचदा ओठांचा चंबू करून विशिष्ट पोझ दिली जाते (इंग्रजीत ज्याला पाउट म्हणतात.) या पोझला किंवा फोटोला डकफेस म्हणण्याची पद्धत आली आहे आणि या शब्दाची दखलही ऑक्सफर्डने आपल्या अपडेट्समध्ये घेतली आहे. याशिवाय ऑनलाइन गेमिंगच्या जगातले काही शब्द respawn, permdeath सारखे शब्दही नव्याने समाविष्ट झाले आहेत.
या नवीन संकल्पनांची माहिती करून घायला हवी, नाही तर आजच्या या फास्ट फोरवर्ड जगात स्वत:ला अपडेट केलं नाही तर आउटडेटेड व्हायला वेळ लागणार नाही. तरुणाईच्या फास्ट आणि इन्स्टंट भाषेला आपलीशी करणारी ऑक्सफर्ड डिक्शनरी त्याबाबत प्रमाण मानली पाहिजे.
  
ऑक्सफर्ड शब्दकोशात समाविष्ट झालेले काही नवे शब्द आणि संज्ञा

vv01 

New words, new generation

Last year, the new generation includes diksanarita some 'giki' new words and concepts. These words and the new generation of changing women earn ..

WDYT
Today's e-generation is so phastaphoravarda and teknosevhi, their lowest, vaganyataca not appear when changes bhasetasuddha. Instant messaging and chatting online apps even though this age of social networking and English became the language of communication is a well established globally mesejingakarita young generation that uses the English rhythm. There is an instant messaging or your language. The number of new compact rupam, phrases, concepts are. Oxford English diksanarinam took notice. Knocked over the last year, so the new words and their meanings .. diksanarita information by taking the air WDYT?

Ur fone's oor. Me coming tomoz. Kept message with dad ... ICYMI.
Neha Neha's mother sent this message on the vhotsaaepa active recently. What porinam they wrote, explaining that it was not written in any language thangapattaca. Because it represents a further word she wrote short katamadhye. This says that today's generation mobile lingo. While the mobile message, Twitter updates while the language used to shortcuts. When typing as fast as they are presently written many short form words. Your opinion was Ur, when today's children what language and what it reveals very similar to hear mothayankaduna note writing unclean, but now Take some pretty words inserted in the Oxford Dictionary of. The Oxford English Dictionary is a method to update three times a year. Some of the new words in the dictionary are included in each quarter. In the words of the Oxford English in 2014 included a large number of newly diksanarita add words are anything new generation of sevhi Internet age. Top vakyatale fone, tomoz, ICYMI this word will now appear diksanarita Neha.
Today's wired generation so that these changes phastaphoravarda and teknosevhi their lowest, if not vaganyataca speak and appear to have taken note of that and when bhasetasuddha Oxford diksanarinesuddha. Some of the popular language of SMS in the short forms there. But there are a few different second new design. There are a few phrases. Back universal language of today's digital giki language is English, but to express real. Without another word that is used to help watch impaired debris that needs to be fixed cord English and new names, as it should not go. So young bolibhasetila dakaphesa, mahusiva, Al desko is now a place of such words Oxford Dictionary.
While chatting with Instant Messaging app and reduce the time required to type the word fast as brief and tvitarasarakhi forget water if you are using the social networking site that takes the word to use katekorapaneca. These words are not kerektarsaci limit. So sortakataca words are used. xlnt, fone, tomoz this word are now part of Oxford diksanarica. There has been little change speilaga original English word. Have had to be written in the usual bhasetali bid sanksiptarupata sentence. The text did not let him do matrinine or friend WDYT speilaga he held such a mistake in the. You 'What do think "Asking that it is a shortcut. Some of the new design are joined. What is Self, who do not want to tell it now. Own photo Fortunately Lip flask by removing certain poses are given (in English, which is called pauta.) Or the method or pojhala say dakaphesa updates in your photo, and took cognizance of a word or Oxford. Besides the online gaming world a few words respawn, have been included in the new words like permdeath.
Need to know concepts or new injuries, or fast-forward to today's world, if not himself, but did not have time to be autadeteda to update. Youth's fast and instant language should be considered the same rate that adapt the Oxford Dictionary.
   
Some of the new words and terms were included in the Oxford Dictionary

No comments:

Post a Comment