Girls Outfits and Wardrobe
वॉर्डरोबमध्ये पाहिजेतच असे कॅमिसोल
तुम्ही त्याला व्हेस्ट म्हणा नाहीतर गंजी, कॅमिसोल, टँक टॉप्स. नावं अनेक असली तरी त्याचा उपयोग प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये होतोच. सध्या ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक टय़ुनिक्सची आणि टॉप्सची फॅशन आली आहे आणि यामध्ये व्हेस्ट सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतं. कोणत्या रंगाच्या टय़ुनिकच्या आत कोणत्या रंगाचे व्हेस्ट घालावे हा प्रश्न प्रत्येकीला सतावतो. त्याबद्दलच्या काही खास टिप्स :
* ट्रास्परंट टय़ुनिक किंवा शर्टच्या आत शक्यतो त्याच रंगाचे टय़ुनिक्स घालणं कधीही उत्तम. पण अर्थात कोणत्या स्टाईलचे व्हेस्ट घालता आहात हे पाहणं गरजेचं आहे. डीप नेक टय़ुनिकवर नेहमीचे टँक टॉप्स घालू शकता. पण अर्थात तुमच्या टय़ुनिक किती पारदर्शक आहे त्यावर टँक टॉपचा थिकनेस अवलंबून असतो. त्यामुळे जर टय़ुनिक जास्तच पातळ असेल तर टँक टॉप जाडा असणं गरजेचं आहे. कारण कित्येकदा बसताना किंवा धावपळ करताना जाड टँक टॉप्स जागच्या जागी राहतात.
* गडद रंगाच्या टय़ुनिक्ससाठी बारीक स्ट्रॅप्सचे कॅमिसोल्स वापरता येतात.
* डीप अंडरआर्मच्या टय़ुनिक्ससाठी टी-शेप गंजी घालावेत. जेणेकरून कॅमिसोल्सचे स्ट्रॅप्स बाहेर डोकवण्याचा प्रश्न नसतो.
* कित्येकदा आपल्या टय़ुनिकच्या रंगाचा व्हेस्ट मिळत नाही. पेस्टल शेड्ससोबत हा प्रश्न जास्त भेडसावतो. अशा वेळी त्याच रंगाचा व्हेस्ट घालण्याऐवजी कॉन्ट्रास्ट शेडचे व्हेस्ट घालून स्टाईल स्टेटमेंट तयार करता येतं. व्हाइट टय़ुनिकवर व्हाइट व्हेस्ट घालण्याऐवजी गुलाबी, आकाशी, पिवळ्या रंगाचे व्हेस्ट अधिक उठून दिसते.
* बेज, क्रीम, गुलाबी, आकाशी अशा पेस्टल शेड्ससाठी त्याच शेडमधील डार्क रंग म्हणजेच ब्राऊन, लाल, निळ्या रंगाचे व्हेस्ट किंवा कॅमिसोल्स घालता येतात.
* ओव्हरसाइज टय़ुनिक्ससोबत कॉन्ट्रास्ट किंवा प्रिंटेड टँक टॉप्स घालता येतात. कारण या टय़ुनिक्समधून हे गंजीज लपवता येत नाहीत, म्हणून कॉन्ट्रास्ट गंजी तुमच्या ड्रेसिंगचा एक भाग होतात.
* हल्ली दोन कॉन्ट्रास्ट गंजी एकत्र घालून त्यावर श्रग किंवा जॅकेट घेण्याचा ट्रेंडही प्रचलित आहे.
No comments:
Post a Comment