Sunday, January 11, 2015

चीनमध्ये बुरख्यावर बंदी


आयसिस, तालिबान, अल् कायदासारख्या दहशतवादी संघटनांनी इस्लामच्या नावावर जगभरात हिंसाचार चालवला असतानाच चीन सरकारने त्यांच्या देशातील मुस्लिमबहुल उरुम्की शहरात सार्वजनिक ठिकाणी बुरखा बंदी लागू केली आहे. चीनचा हा प्रांत मुस्लिम फुटिरतावाद्यांचा बालेकिल्ला असल्याने या निर्णयाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये शिनझियांग हा मुस्लिमबहुल प्रांत आहे. हिंसाचाराने खदखदणाऱ्या या प्रांताची राजधानी उरुम्की येथे चीनने बुरखाबंदी केली आहे. ही घोषणा करताना सरकारने फ्रान्स व बेल्जियममधील बुरखाबंदीचा हवाला दिला आहे. बुरखाबंदीच्या निर्णयाच्या एक दिवस आधीच कडव्या धार्मिक विचारांचा प्रसार करणाऱ्या वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे.

शिनझियांग उईगुर या स्वायत्त प्रांताच्या विधानसभेने या निर्णयाला मान्यता दिली. बुरखा हा उईगुर समाजाच्या महिलांचा पारंपरिक वेष नसल्याचे विधानसभेने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment