Monday, May 16, 2016

नागराज-सुनिता यांचा काडीमोड कायदेशीरच, वाचा किती दिली होती पोटगी

पुणे - दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या 'सैराट' या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आहेत. मात्र शुक्रवारी त्यांच्या खासगी आयुष्यातील घटना पुढे आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. नागराज मंजुळे यांनी आपल्या पत्नीला घरातून हाकलून दिले असून तिच्यावर धुणे-भांडी करण्याची वेळ आल्याचे वृत्त होते. मात्र नागराज मंजुळेंच्या वैवाहिक जीवनाबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु झाल्यानंतर अॅडव्होकेट विकास शिंदे यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाजू मांडली आहे.

''नागराज मंजुळे आणि सुनिता मंजुळे यांचा पुण्यातील न्यायालयात १० नोव्हेंबर २०१४ रोजी दोघांच्या सहमतीने घटस्फोट झालेला आहे. त्यामध्ये नागराज यांनी सुनिता यांना कायमस्वरुपी पोटगी म्हणून सात लाख रुपये दिलेले आहेत. त्यामुळे या दोघांचे नवरा-बायकोचे नाते कायद्याने संपु्ष्टात आलेले आहे. सुनिता करीत असलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. नागराज यांना विनाकारण बदनाम करण्यात येत आहे,'', असे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment