Essay on hibiscus flower in Marathi - Jaswand fulanchi mahiti Marathi

hibiscus in marathi

jaswand fulanchi mahiti marathi

hibiscus in hindi

hibiscus english to marathi

आपल्या लाडक्या गणेशाचं आगमन झालंय. घरोघरी मोठय़ा धामधूमीत गणेशोत्सव साजरा होतोय. त्याला प्रिय असणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे जास्वंदाचं फूल होय. आज आपण जास्वंदाच्या फुलाची माहिती घेणार आहोत.

जास्वंद ही आशिया खंडात सापडणारी एक अत्यंत महत्त्वाची सदाहरित वनस्पती. जास्वंदाचे शास्त्रीय नाव  Hibiscus rosa – Sinesis (हिबिस्कस रोसा – सायनेसिस). नावावरून याचे उगम स्थान चीन असावे असे वाटते. परंतु अनेक शास्त्रज्ञांच्या मते, ही वनस्पती हजारो वर्षांपूर्वी आशिया खंडात सगळीकडे आढळते, त्यामुळे तिला भारतीय मानायला काही हरकत नाही.

भारतात हजारो वर्षांपासून जास्वंदाचा अनेक पूजा विधींमध्ये, आयुर्वेद, रंगकाम अशा अनेक गोष्टींमध्ये वापर करण्यात येतो. जास्वंदाला इंग्रजीत shoe flower, chinese rose  असे म्हणतात. तर संस्कृतात त्याला ‘जपा’ असे नाव आहे.

जास्वंद ही झुडूप वर्गीय सदाहरित वनस्पती असून, तिची उंची जास्तीतजास्त पंधरा फुटांपर्यंत असू शकते. जास्वंदाच्या फुलात पाच पाकळ्या असतात. फूल आकाराने मोठे असून पाकळ्या मांसल असतात. पुयुग्म आणि स्त्रीयुग्म हे भाग फुलाच्या मध्यभागी एका दांडीवर असतात. परागकण किडणीच्या आकाराच्या पिशव्यांमध्ये बंदिस्त असतात. या पिशव्या पिवळ्या रंगाच्या असतात. फुलाच्या मध्यभागी असणाऱ्या दांडीच्या वरच्या बाजूला असतात. आपल्या अनेक रंगांची जास्वंदाची फुले आढळतात. लाल, गुलाबी, पिवळा, सफेद, निळा या वेगवेगळ्या रंगाची जास्वंदाची फुले आढळतात. आजकाल भगवा, गडद पिवळा, गडद गुलाबी आणि इतरही रंगात जास्वंदाच्या जाती रोपवाटिकेमध्ये उपलब्ध आहेत. त्यातील लालभडक रंगाचे फूल गणपतीला वाहिले जाते. गणपती अथर्वशीर्षांत वर्णन केलेले फुलाचे वर्णन जास्वंदाशी तंतोतंत जुळते. म्हणूनच कदाचित हे फूल गणपतीला वाहत असतील.

जास्वंदाच्या फुलाचा औषधात वापर केला जातो. केस गळणे बंद व्हावे यासाठी हे फूल अत्यंत गुणकारी असून, अनेक प्रकारच्या तेलांमध्ये याचा वापर केला जातो. जास्वंदाच्या पाकळ्या मांसल असतात. काही भागात सलाड म्हणून त्या खाल्ल्या जातात. या पाकळ्यांचा चहादेखील केला जातो. जास्वंदाचा चहा अत्यंत गुणकारी आहे. त्वचा रोग, केसांचे आरोग्य, तारुण्य टिकवण्यासाठी, रोगप्रतिकारक  क्षमता वाढविण्यासाठी, श्वसनाचे विकार या सगळ्यांत जास्वंदाचे फूल औषध म्हणून वापरले जाते. जास्वंदाच्या पाकळ्या सावलीत  वाळवून त्यावरून नैसर्गिक निळा रंग तयार केला जातो. हजारो वर्षांपूर्वी अजिंठा, वेरूळ येथील लेण्यांमध्ये काढलेली चित्रे रंगवण्यासाठी याच जास्वंदाच्या फुलांपासून बनविलेला रंग वापरला गेलाय, तो अजूनही तितकाच ताजा वाटतो. अनेक पुरातन मंदिरे, महाल, राजवाडे यांमधील कलाकुसरीत जास्वंदाच्या फुलाचा रंग वापरला गेला आहे. याच फुलांचा रस काढून त्यात साधा सफेद कागदाचा तुकडा बुडवून वाळवला की झाला आपला  ढऌ पेपर तयार! तो तुम्ही आम्लातीत बुडवला तर हिरवा आणि आम्लात  बुडवला तर गडद गुलाबी होतो. याच्या गडद रंगामुळे आणि सुंदर रचनेमुळे या झाडांची मंदिरात, शाळा परिसर, उद्यानात शोभेची वनस्पती म्हणून लागवड होते. जास्वंदाला वर्षभर फुले येतात. या फुलांना सुगंध नसतो.

जास्वंदाची पाने गडद हिरव्या रंगाची असून पसरट असतात. पानांचा आकार वेगवेगळा असतो. पानांची कडा दातेरी असते. ही पानेदेखील औषधी असतात. केस मजबूत आणि घनदाट होण्यासाठी वापरली जातात. तसेच पानांचा रस आणि काढा हा अनेक व्याधींवर गुणकारी मानला जातो.

जास्वंदाच्या झाडाची साल आणि मुळेदेखील औषधात वापरली जातात. मधुमेह नियंत्रणात जास्वंदाच्या फुलांच्या वापरावर संशोधन चालू असून त्याचे निकाल सकारात्मक आहेत.

जास्वंदाच्या झाडाला फळे येत नाहीत. फळे नाही त्यामुळे बिया नाहीत. फांद्यांपासून नवीन रोपे तयार करता येतात. जास्वंद अगदी कमी पाण्यात वाढते. गावाकडे घराभोवती तसेच शेताला कुंपण करण्यासाठी याचा वापर केला जातो. अतिशय औषधी असणारी, गणपतीला प्रिय असणारी जास्वंद वनस्पती आपल्या हरित धनात नसेल तर आपल्यासारखे दुर्भागी आपणच. आपण कुंडीमध्येदेखील याची लागवड करू शकतो.

essay on jaswand

hibiscus

essay on hibiscus flower in marathi

hibiscus information in english

jaswand chi mahiti marathi

1 comment:

  1. It means in Covid -19 also this flower will work like medicine

    ReplyDelete